breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

धारावीत कोरोनाचे आणखी 4 नवे रुग्ण; कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 672 वर

मुंबई येथील धारावी परिसरात कोरोना विषाणूचे जाळे मोठ्या वेगानं पसरत चालले आहे. धारावीत आज कोरोनाचे आणखी 4 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या 2 हजार 672 वर पोहोचली आहे. ‘मिशन धारावी’च्या यशामुळे कोरोनाचे उच्चाटन होण्याच्या दिशेने धारावीची वाटचाल सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाकडून यापूर्वीच धारावी परिसराची नाकेबंदी करण्यात आली होती. तसेच येथील अनेक परिसर सील करण्यात आले होते. मुस्लिम नगर आणि मुकूंदनगरमध्ये आतापर्यंत कोरोनाच सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत डॉक्टरांच्या पथकांकडून धारावीतील हजारो लोकांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे.

यामध्ये कोरोनाचा संभाव्य धोका असलेल्या लोकांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वारंटाईन करण्यात आले आहे. धारावीसह दादर आणि माहीम परिसरातही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. धारावी सारख्या दाट वस्ती असलेल्या परिसरात कोरोनावर नियंत्रण मिळविण्या मुंबई महानगरपालिकेला यश आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button