धक्कादायक! शाळेच्या शौचालयात शिक्षिकेच्या मुलाचे लैंगिक शोषण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/111.jpg)
मुंबई – शाळेच्या शौचालयातच शिपायाने शिक्षिकेच्या ७ वर्षीय चिमुरड्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. तसेच याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी सनी रमेश टाक (३०) याला पॉक्सो तसेच धमकाविल्याच्या गुन्ह्यात अटक केली.
मुलाने रडण्यास सुरुवात करताच, रमेशने त्याला दम दिला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने मुलाला दिली. मात्र, मुलाने रडतरडत आईकडे धाव घेत घडलेला प्रकार सांगितला. त्यानुसार आईने बुधवारी रात्री चेंबूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिपायाविरुद्ध पॉक्सो, धमकाविण्याप्रकरणी गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला २० तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.