breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

देशातील 42.3% मृत्यू महाराष्ट्रात; परीक्षा न घेण्याबाबत राज्यपाल नाराज

मुंबई | महाराष्ट्रात मागील 24 तासांत कोरोनामुळे 63 लोकांचा मृत्यू झाला. राज्यातील मृतांचा आकडा 1517 वर पोहचला आहे. तर देशात आतापर्यंत 3583 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. त्यानुसार देशातील 42.3% मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शेवटच्या वर्षाची परीक्षा रद्द करण्यासाठी यूसीजीला पत्र लिहिल्यामुळे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेतला आहे. अयोग्य हस्तक्षेप टाळण्यासाठी राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या मंत्र्यांना योग्य त्या सूचना देण्यास सांगितले. हे यूजीसी मार्गदर्शक तत्त्वांचे तसेच महाराष्ट्र राज्य विद्यापीठ अधिनियम -2016 च्या तरतुदींचे उल्लंघन असल्याचे कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले. युजीसीला अंतिम वर्षाची वार्षिक परीक्षा रद्द करण्याची शिफारस करण्यापूर्वी मंत्र्यांनी त्यांना माहिती दिली नसल्याचेही राज्यपाल म्हणाले.

मुंबईत दारूची ऑनलाइन डिलिव्हरी सुरू

बीएमसीने मुंबईत अटी आणि शर्तींसह दारुची होम डिलिव्हरी करण्यात परवानगी दिली आहे. होण डिलिव्हरी फक्त सीलबंद बाटल्यांतून करण्यात येईल. कंटेनमेंट झोनच्या बाहेर ज्यांची घरे आहेत ते लोक आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा वापर करुन दारूच्या दुकानातून बाटल्यांची होम डिलीव्हरी घेऊ शकतात. मुंबईत सध्या दुकानांतून दारू विक्रीस परवानगी नाही.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button