breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

देशभरातील पेट्रोल पंप राहणार बंद

– पेट्रोल डीलर्स संघटना शहीदांना वाहणार आदरांजली

मुंबई : पुलवामाच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना ‘कॉन्सोर्टियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डिलर्स’ (सीआयपीडी) यांच्याकडून आदरांजली वाहिली जाणार आहे. बुधवार २० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता ही आदरांजली वाहण्यात येणार आहे. सीआयपीडीशी संलग्न असणारे राज्यासह देशभरातील सर्व पेट्रोल पंप सायंकाळी २० मिनीटांसाठी बंद राहणार असून महाराष्ट्रातील पेट्रोल डीलर्स संघटना या शहिदांच्या आदरांजलीमध्ये सहभागी असल्याचे ‘फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशन’चे (फामपेडा) अध्यक्ष उदय लोध यांनी सांगितले.

बुधवारी सर्व पेट्रोल पंपावरती शहिदांना आदरांजली वाहणारे फलक लावले जाणार आहेत. बुधवारी सायंकाळी ७ ते ७ वाजून २० मिनिटांपर्यंत पेट्रोल पंपावरील दिवे मालवले जातील. या २० मिनिटांसाठी पंपावरील सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचे सीआयपीडीकडून सांगण्यात आले. सर्व वाहन चालकांनी पेट्रोल पंप बंद होण्याआधी किंवा नंतर इंधन घ्यावे. कुठल्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी आधीपासूनच वाहन चालकांनी काळजी घेण्याची विनंती सीआयपीडीकडून करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button