तुमच्या या मोबाईलवर 31 डिसेंबरनंतर व्हॉट्सअप होणार बंद
मुंबई – तुमच्या दैनंदिन जीवनात सर्वात महत्वाचे भाग असणारे व्हॉट्सअप आता एक नविन फिचर घेऊन येत आहे. मात्र जुन्या यूजर्ससाठी ही बॅड न्यूज असणार आहे. ३१ डिसेंबरनंतर व्हॉट्सअपने काही जुन्या ऑपरेटींग सिस्टमला सपोर्ट करणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
१ फ्रेबुवारी २०२० नतंर एंन्ड्रॉईड २.३.७ आणि iphone ios७ यापेक्षा जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर व्हॉट्सअप चालणार नाही. व्हॉट्सपकडून सांगण्यात आले की, या प्लेटफॉर्मच्या सोबतीने आम्ही फिचर्स डेव्हलप करु शकत नाही. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेत आहोत. या सोबतच आमच्या काही फिचर्स कोणत्याही क्षणीही बंद होऊ शकतात.
नोकियाचे जुने ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप वापरता येणार नाही. Nokia S४०, या ऑपरेटिंग सिस्टमवरच्या फोनवर ३१ डिसेंबर नंतर व्हॉट्सअप चालणार नाही. जुन्या windows Phone ८.०, ब्लॅकबेरी os आणि ब्लॅकबेरी अशा १० मोबाईलमधील व्हॉट्सअप ३१ डिसेंबर २०१७ ला बंद करण्यात आले होते.