…तर संजय राऊत यांचा कडेलोट केला असता
![Nilesh Rane critisize Shivsena Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/sanjay-raut-Nilesh-Rane.jpg)
भाजप नेते निलेश राणे यांचा हल्लाबोल
मुंबई | प्रतिनिधी
आज जर महाराज असते तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता, असा जोरदार हल्ला भाजप नेते निलेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर केला. सामना मध्ये भाजपवर टीका करणारा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. त्याला राणे यांनी प्रत्युत्तर दिले.
सामनाच्या अग्रलेखात नमूद केले आहे की, मंदिराच्या वर्गणीनिमित्ताने चार लाख स्वयंसेवक हे संपर्क अभियान राबविणार आहेत. हे संपर्क अभियान म्हणजे रामाच्या आड २०२४ चा निवडणूक प्रचार असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीयमधून खासदार राऊत यांनी हा आरोप केला आहे.
तर निलेश राणे म्हणाले की, शिवसेनेनी लाज सोडली. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आयुष्यभर फक्त वापर केला. महाराज आज असते तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता. ज्यांचे घर वर्गणीतून चालते तेच विचारत आहेत मंदिर वर्गणीतून बांधणार काय? जनाची नाही पण किमान मनाची लाज तर ठेवा, असे म्हणत शिवसेनेवर राणे यांनी निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्यावर हल्लाबोल केला.