…तरीही मास्क बंधनकारकच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
!["So be prepared for restrictions like lockdown" - Chief Minister Uddhav Thackeray](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/uddhav-thakrey.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मीडियाद्वारे जनतेशी संवाद साधला. या वेळी देशात कोरोनाची लस येत आहे. मात्र तरीही लोकांनी मास्क घालणे बंधनकारकचं असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, आपल्या सुरक्षेसाठी कोरोनाबाबतचे नियम आपल्याला पाळावेच लागणार आहेत. कोविड सुरू झाला तेंव्हा भेटींची वारंवारता जास्त होती. मी आजपर्यंत जे काही सांगत आलो ते आपण मनापासून अंमलात आणत गेलात. त्यामुळे आपण नियंत्रण मिळवले आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धनजींनी सांगितल आहे की व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल. त्यामुळे माझ्या मते 6 महिने तरी मास्क लावावा लागेल, असं मुख्यमंत्री म्हणाले. पूर्ण नाही पण काही प्रमाणात संसर्गाला अटकाव आला आहे. जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांच पालन केलं. सावध रहा हे सांगण कुटुंबप्रमुख म्हणून माझं कर्तव्य आहे, असंही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.