breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

ठाण्यात शिवसेना मनसेचे बाजूबाजूला होर्डिंग्स, सोशल मीडियानंतर आता पोस्टर वॉर

ठाणे | ठाण्यात मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक झाल्यानंतर शिवसेना आणि मनसेमध्ये सोशल मीडियावर वॉर सुरू झाले. अविनाश जाधव यांची सुटका होताच ठाण्यातील राजकारण तापले. शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी सोशल मीडियानंतर आता आपला मोर्चा पोस्टर वॉरकडे वळवला आहे. त्यामुळे शहरात सेना आणि मनसेचे आरोप प्रत्यारोपाचे पोस्टर झळकू लागले आहे. त्यामुळे सध्या ठाण्यात सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मनसैनिकांकडून टीका करण्यात येत आहे. त्यानंतर शिवसेनेनेही त्यांच्या टीकेला उत्तर दिले. एकीकडे पालकमंत्री यांच्या कार्याचे दाखले देणारा तर त्याच्या बाजूला अविनाश जाधव कधी थांबणार नाही असे म्हणणारे होर्डिंगस लागले आहेत. सत्ताधारी आणि विरोधक यांची ही श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे चित्र ठाण्यात पाहायला मिळत आहे.

अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस आल्यानंतर आणि त्यांना अटक झाल्यानंतर मनसैनिकांकडून एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका सुरु झाली. सोशल मीडियावर ही शाब्दिक युद्ध सुरू होते. त्याआधी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देण्याची मागणी मनसैनिकांकडून केली जात होती. त्यानंतर महापौर नरेश म्हस्के आणि शिवसेनेचे राम रेपाळे यांनीही त्यांच्या टीकेला उत्तरं देऊन पालकमंत्री यांच्यावर वैयक्तिक टीका करणे चुकीचे आहे, असे म्हटले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button