Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
ज्या देशात विद्यार्थ्यांवर बंदुका रोखल्या जातात त्या देशाची लोकशाही आणि देश संकटात: संजय राऊत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/12/Sanjay-Raut-copy.jpg)
मुंबई | महाईन्यूज
नागिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्या दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचे प्रकरण सध्या तापले आहे. विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर जाळपोळ आणि हिंसाचाराचे प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी विद्यापीठाच्या आवारात घुसून विद्यार्थ्यांवर लाठीमार केलेला होता. या सर्व प्रकारावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपावर निशाणा साधलेला आहे.
संजय राऊत म्हणाले की, ज्या देशांमध्ये विद्यार्थ्यांवर बंदुका रोखल्या जातात, त्यांचे आंदोलन दडपले जाते त्या देशाची लोकशाहीसोबतच देश देखील संकटात असतो असा जगभराचा अहवास असल्याचे संजय राऊत सांगत भाजपावर जोरदार टीका केलेली आहे.