जावेद अख्तर आणि शबाना आझमी यांच्या गाडीला अपघात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Acciddent.jpg)
मुंबई | ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी हे अपघातात जखमी झाले आहेत. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात दोघांनाही दुखापत झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. दुपारी चारच्या सुमारास ही दुर्घटना झाली.
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर टाटा सफारी आणि ट्रक यांची धडक झाली. खालापूर हद्दीत हा अपघात झाला. या अपघाताची तीव्रता गाडीच्या फोटोवरुन येऊ शकते. अपघातात शबाना आझमी यांना दुखापत होऊन, त्यांच्या शरिरावरचं रक्त फोटोंमधून दिसत आहे.
दरम्यान, जखमी झालेल्या शबाना आझमी यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. जावेद अख्तर यांना सुदैवाने फारशी दुखापत झालेली नाही. ते सुखरुप असल्याचं सांगण्यात येत आहे.