breaking-newsमुंबई
चिपळूणमध्ये कोरोना रुग्णाची गळफास घेऊन आत्महत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/sucide.jpg)
चिपळूण – कोरोनाची लागण झाल्यामुळे कामथे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ४५ वर्षांच्या रुग्णाने मध्यरात्रीच्या सुमारास रुग्णालयाच्या गच्छीवर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.
चिपळूणच्या अंबड गावातील ४५ वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यामुळे ६ ऑगस्टला त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र काल मध्यरात्री या रुग्णाने रुग्णालयाच्या गच्चीवर जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती मिळालेली नाही, असे पोलीसांनी सांगितले.