गेटवेवरील आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; आझाद मैदानात रवानगी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/getway.jpg)
मुंबई | महाईन्यूज
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. रविवारी (5 जानेवारी) विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे. जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील विविध संघटना, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक गेट वे ऑफ इंडियाजवळ एकत्र जमले आणि त्यांनी हल्ल्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने केलेली आहेत. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच आहे.
गेटवे परिसरात हल्ल्याचा जोरदार निषेध करण्यात येत आहे. पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदानात जाण्याची सूचना केलेली आहे. मात्र आंदोलक गेट वे ऑफ इंडियावरच ठाण मांडून बसले होते. परिसरात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. तसेच आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची रवानगी ही आझाद मैदानात करण्यात आली आहे. आझाद मैदानात जाण्यासाठी आंदोलकांनी विरोध केला आहे. गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलेलं नाही, आझाद मैदानात त्यांची रवानगी केल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.