गुगलने डूडलद्वारे केला ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल यांचा सन्मान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/shegal.jpeg)
मुंबई – नाट्य आणि चित्रपट क्षेत्रावरही आपल्या लक्षणीय अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या, गेल्या पिढीतील ज्येष्ठ अभिनेत्री जोहरा सेहगल यांच्या कार्याला आज गुगलने सलाम केला आहे. डूडलच्या माध्यमातून गुगलने सेहगल यांच्या कामाची दखल घेतली आहे. या डूडलमध्ये जोहरा या त्यांच्या प्रसिद्ध नृत्य अदामध्ये दिसत आहेत. हे डूडल पार्वती पिल्लाई यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आले आहे.
गुगल डूडलच्या ब्लॉगमध्ये म्हटलंय, ‘आजचे डूडल हे पाहुण्या चित्रकार असणाऱ्या पार्वती पिल्लाई यांनी साकारले आहे. जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या आणि ठसा उमटवणाऱ्या पहिल्या काही भारतीय कलाकारांपैकी एक असणाऱ्या अभिनेत्री आणि नृत्यांगना जोहरा सेहगल यांच्या कार्याचा या माध्यमातून गौरव करण्यात येत आहे. त्यांनी केलेल्या काही अविस्मरणीय भूमिकांमध्ये निच्चा नगर चित्रपटातील भूमिकेचाही समावेश आहे. हा चित्रपट १९४६ साली आजच्याच दिवशी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेला पहिला भारतीय चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाला या फेस्टिव्हलमधील सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच द पाल्म डीयोर पुरस्कार मिळाल होता.’