breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
खासदार कपिल पाटील यांच्या गाडीने घेतला अचानक पेट
![MP Kapil Patil's car suddenly caught his stomach](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/CAR-FIRE.jpg)
ठाणे – भिवंडी मतदारसंघाचे भाजप खासदार कपिल पाटील यांच्या गाडीने आज अचानक पेट घेतला. भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच धावपळ उडाली. कपिल पाटील एका कार्यक्रमासाठी कल्याण शहाड येथे आले होते, तेव्हा हा प्रकार घडला.
याबाबत अग्निशमन विभागाला माहिती मिळताच अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत संपूर्ण गाडी जळून खाक झाली असून गाडीचे मोठे नुकसान झाले.दरम्यान, ही स्कॉर्पिओ अचानक कशी काय पेटली, याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. खासदारांच्या ताफ्यातील गाडी पेटल्याने परिसरात एकच चर्चेचा विषय ठरला आहे.