breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कोट्यधीश आहेत शिवसेनेचे युवराज

मुंबई – युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक रिंगणात उतरणारे आदित्य हे पहिले ठाकरे ठरले आहेत. त्यांचा उमेदवारी अर्ज भरताना शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि सर्व ठाकरे कुटुंब उपस्थित होते. हा अर्ज भरण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी वरळीत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं.

आदित्य ठाकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना महायुतीची एकजूट दाखवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित रहाणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. पण मुख्यमंत्र्यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्याचं सांगण्यात येत आहे. सकाळी ९ वाजता लोअर परळ इथल्या ‘शिवालय’ या शिवसेना शाखेपासून आदित्य ठाकरे यांचं मोठं शक्ती प्रदर्शन करत मिरवणूक निघाली. त्यानंतर त्यांनी वरळी इथल्या बीएमसी इंजिनियरिंग हबमधील निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.

किती आहे आदित्य ठाकरेंची एकूण संपत्ती

  • 11 कोटी 38 लाख ऐवढी आदित्या ठाकरेंची एकूण संपत्ती आहे
  • यात एक बीएमडब्ल्यू गाडी ज्याची किंमत 6 लाख 50 हजार आहे
  • – दोन व्यावसायिक गाळे
  • – कर्जत खालापूर इथे काही गुठें जमीन
  • – बॅंकेतल्या ठेवी 10 कोटी 36 लाख
  • – डिव्हीडंट शेअर आणि काही दागिने
  • – 10 लाख 22 हजार इतर
  • – 64 लाख 65 हजार दागिने
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button