कुटूंब कसे चालवायचे हे मोदींना काय माहीत – शरद पवार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/sharad-pawar8.jpg)
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने महाराष्ट्रातील सभांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबातील वादावर हल्ला चढवला होता. मोदींच्या या टीकेला शरद पवार यांनी देखील सडेतोड उत्तर दिले आहे. कुटुंब कसे चालवायचे हे मोदींना काय माहीत असले, असा प्रश्न विचारत पवारांनी मोदींचा समाचार घेतला.
मोदी सातत्याने म्हणत आहेत की, शरद पवार चांगले व्यक्ती आहेत. पण त्यांच्या घरात कलह सुरु आहे. पवारांचा पुतण्या त्यांच्या हाताबाहेर गेला आहे. पण माझ्या घरातील प्रश्नांवर त्यांना काय करायचे आहे, असा सवाल पवारांनी विचारला. मोदींच्या टीकेवर विचार करताना माझ्या लक्षात आले की मी माझी पत्नी, मुलगी, जावई आणि नातवंडासोबत राहतो. पण त्यांना यापैकी कोणीच नाही. मोदींना दुसऱ्यांच्या घरात काय चालले आहे हे पाहण्याची काय गरज आहे. यासंदर्भात खालच्या पातळीवर यायचे नसल्याने मी अधिक काही बोलणार नाही, असे पवारांनी स्पष्ट केले.
Sharad Pawar: Modi Ji says 'Pawar Sahab is a good man but has family issues. His nephews are out of his hands.' I wanted to ask him what does he have to do with issues at my home? But then I realised I've my wife, daughter; son-in-law, nephews visit us, but he has no one. (15.4) pic.twitter.com/pKoWCCjScV
— ANI (@ANI) April 17, 2019
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी महाराष्ट्रातील प्रत्येक सभेत काँग्रेस पक्षावर अथवा नेत्यांवर टीका करण्याऐवजी शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबावर टीका केली आहे. या टीकेला पवारांनी आता उत्तर दिले आहे.