काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांचा वयाच्या ६० व्या वर्षी विवाह
मुंबई | काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी वयाच्या ६० व्या वर्षी रविवारी विवाह केला आहे. वासनिक यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रविना खुराणा यांच्याशी ते विवाह बंधनात अडकले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, अंबिका सोनी, बीके हरिप्रसाद आणि आनंद शर्मा हे नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी गेले होते.
मुकुल वासनिक हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. काँग्रेसचे तीन वेळा खासदार राहिलेले बाळकृष्ण वासनिक यांचे ते सुपूत्र आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेले आहे. कमी वयात त्यांना राजकारणात पाऊल ठेवले. आज ते प्रसिद्ध नेते आहेत. वासनिक हे तीन वेळा खासदार होते. पहिल्यांदा १९८४-८९ मध्ये लोकसभा सदस्य बनले होते. त्यानंतर त्यांनी दहावी आणि बारावी लोकसभा निवडणूक लढवली होती.