‘काँग्रेसला कोणीही संपवू शकत नाही, पवारांनी दिलेली वाट तात्पुरती’
!['No one can end Congress, Pawar's wait is temporary'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/कॉंग्रेस.jpg)
मुंबई – भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुतणे डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांनी अखेर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. धवलसिंह यांच्यामुळे सोलापूरात काँग्रेसला बळ मिळणार आहे. काँग्रसेचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि धीरज देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये धवलसिंह यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
वाचा :-भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास मानाचा वसंतदादा पाटील पुरस्कार
पक्षप्रवेशानंतर बोलताना धवलसिंह म्हणाले की, मी 8-9 वर्षांचा असताना आम्ही आईस्क्रीम विकून अकलूजमधली पहिली रुग्णवाहिका सुरु केली. आमच्यावर जनसेवेचे संस्कार आहेत. कॉंग्रेस पक्ष आणि मोहिते पाटील यांचे नाते फार जुने आहे.कॉंग्रेसला कोणीही संपवू शकत नाही. विचारधारा आणि तत्त्वांशी बांधिलकी यामुळे काँग्रेसची भक्कमपणे वाटचाल अजूनही सुरु आहे. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवारांनी दिली ती तात्पुरती वाट होती म्हणून कॉंग्रेसच्या मुळाशी आलो आणि खरी वाढ ही मुळापासूनच होते, असे म्हणत धवलसिंह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोला लगावला.दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास केल्यानंतर धवलसिंह मोहिते पाटील काँग्रेसमध्ये दाखल झाले आहे. धवलसिंह मोहिते पाटील हे माजी सहकार मंत्री आणि दिवंगत नेते प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत.