breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या फोटोवर काळे तेल ओतून केला निषेध; फडणवीस संतापले

मुंबई – आंतरराष्ट्रीय पॉप गायिका हिने भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत ट्विट केल्यानंतर भारतीय क्रिकेट खेळाडू सचिन तेंडूलकर याने तिच्याविरोधात ट्विट केलं होतं. त्यावरून सचिनवर टीकेच झोड उठली आहे. त्यातच, केरळमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सचिनच्या फोटोवर काळे तेल ओतून त्याचा निषेध व्यक्त केल ाहोता. मात्र, यावरून महाराष्ट्राच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.

केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत मागील ७० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. अमेरिकी पॉपस्टार रिहाना व पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनं या आंदोलनाबद्दल मत व्यक्त केल्यावर देशातील सेलिब्रिटी देखील व्यक्त होऊ लागले आहेत. देशातील काही क्रिकेटपटू व बॉलिवूड अभिनेत्यांनी रिहाना व ग्रेटाला सुनावलं आहे. भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये ढवळाढवळ करू नका, असं काहींनी म्हटलं आहे. सचिन तेंडुलकरचाही यात समावेश आहे. त्यावरून सचिनसह सर्वच सेलिब्रिटींवर टीका होऊ लागली आहे. मागील ७० दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला काहीच कसे वाटले नाही? इतके दिवस कुठे होतात? असा प्रश्न लोक करू लागले आहेत. भाजपच्या विरोधकांनीही या सेलिब्रिटींवर तोंडसुख घेतलं आहे.

केरळमधील युवक काँग्रेसनं थेट रस्त्यावर येत सचिनविरोधात निदर्शनं केली. कोची येथे सचिनच्या पोस्टरवर काळे तेल ओतून त्याचा निषेध करण्यात आला. फडणवीस यांनी केरळमधील हे फोटो ट्वीट करत महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. ‘केवळ महाराष्ट्राचे नाही, तर संपूर्ण देशाचे भूषण असलेले, भारतरत्न आणि मराठी माणसाचा अभिमान असलेले सचिन तेंडुलकर यांचा असा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का?,’ असा सवाल त्यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button