breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी नाना पटोलेंच्या नावाची घोषणा, अजित पवार उपमुख्यमंत्री?

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची बहुमत चाचणी आज होत आहे. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीने 170 जणांचं संख्याबळ असल्याचा दावा केला आहे. महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षपद यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असलेला वाद आता शमला आहे. कारण विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपमुख्यमंत्रिपद हे राष्ट्रवादीकडे राहणार आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसने ज्येष्ठ आमदार नाना पटोले यांचं नाव निश्चित केलं आहे. त्यांचा अर्ज काँग्रेस दाखल करणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे. उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार हे घेतील, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. मात्र टीव्ही 9 मराठीला विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांनाच उपमुख्यमंत्रिपद मिळण्याची चिन्हं आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button