‘औरंगाबाद विमानतळाला अजिंठा-वेरूळ लेणीचे नाव द्या’, आठवलेंची मागणी
![Even if my security is reduced, my work will not be affected - Ramdas recalled](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/ramdas_athwale.jpg)
मुंबई – औरंगाबाद विमानतळाला अजिंठा वेरूळ लेणीचे नाव द्यावे, अशी नवीन मागणी आता रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
सध्या औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. महाविकास आघाडीत यावरून मतभेद असल्याचे पाहण्यास मिळत आहे. त्यातच औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केंद्राला पत्र पाठवले आहे. मात्र आता रामदास आठवलेंनी नवीन मागणी पुढे केली आहे.
वाचा :-कोरोना लसीकरणासाठी लागणारा खर्च केंद्राने करावा, राज्य सरकारची मागणी
औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोरा लेणीचे नाव द्यावे. अजंठा एलोरा या बौद्ध संस्कृती च्या लेणी असून जागतिक वारसा स्थळ तथा 8 जागतिक आश्चर्य स्थळांपैकी एक आहेत. त्यामुळे औरंगाबाद विमानतळाला अजंठा एलोराचे नाव द्यावे ही रिपाइंची मागणी असल्याचे आठवलेंनी म्हटले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.