Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
उद्याचा महाराष्ट्र बंद मागे, मराठा संघटनांची माहिती
![A delegation of MPs will meet the Prime Minister for Maratha reservation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/Maratha-Morcha.jpg)
मुंबई – सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यामुळे राज्यातील मराठा समाज नाराज झाला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या विविध संघटनांकडून उद्या महाराष्ट्रभर बंद पाळण्यात येणार होता. मात्र, आता हा बंद मागे घेण्यात आला असल्याची माहिती मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत काल रात्री उशीरा बैठक झाली., या बैठकीत मराठा समाजाच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे १० ऑक्टोबर रोजी पुकारण्यात आलेला महाराष्ट्र बंद मागे घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.