breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘आपलं ठेवायचं झाकून’ अन्ं.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनंजय मुंडेनी लगावला टोला

मुंबई |महाईन्यूज|

युती सरकारच्या काळात अनेक भ्रष्टाचार झाले. आम्ही ते पुराव्यानिशी बाहेर काढले. मात्र एका मंत्र्यावरही कारवाई झाली नाही. उलट क्लिनचीट मास्टर मुख्यमंत्र्यांनी सर्वांना दोषमुक्त जाहीर केले. आपलं ठेवायचं झाकून..हीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नीती असल्याचा टोला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी लगावला.

मुंडे यांनी हे टि्वट केले आहे. युती सरकारमधील काही मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. चार दिवसांपूर्वीही त्यांनी टि्वट करुन तत्कालीन मंत्री प्रकाश मेहता आणि विद्यमान सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या भ्रष्टाराच्या प्रकरणाचा दाखला देऊन टि्वट केले होते. आज पुन्हा त्यांनी यावरुन मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधला. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button