breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आदर्श आचारसंहितेत ‘या’ सर्व गोष्टींवर निर्बंध, वाचा सविस्तर बातमी

मुंबई – निवडणूक आचारसंहिता (आदर्श आचारसंहिता / आचारसंहिता) म्हणजे निवडणूक आयोगाच्या सूचनांचे काटेकोर अनुसरण केल पाहिजे. या सूचनांचे पालन प्रत्येक पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी निवडणुकीच्या समाप्तीपर्यंत करणे अपेक्षित असते. जर उमेदवार या नियमांचे पालन करत नसेल तर निवडणूक आयोग त्याच्याविरुद्ध कारवाई करू शकतो. संबंधित उमेदवाराला निवडणूक लढविण्यापासून रोखू शकतो, एफआयआर दाखल केला जाऊ शकतो आणि दोषी ठरल्यास संबंधिताला तुरुंगातही जावे लागू शकते.

महाराष्ट्र एकाच टप्प्यात निवडणूक

  • नामनिर्देशन अर्जांची सुरुवात – 27 सप्टेंबर
  • अर्ज भरण्याची अंतिम मुदत – 4 ऑक्टोबर
  • अर्जांची छाननी – 5 ऑक्टोबर
  • अर्ज परत घेण्याची अंतिम मुदत – 7 ऑकटोबर
  • मतदान – 21 ऑक्टोबर
  • निकाल – 24 ऑक्टोबर

राज्यांमधील निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्याबरोबरच आचारसंहिताही लागू झाली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू होताच राज्य सरकार आणि प्रशासनाला अनेक निर्बंधांचा सामना करावा लागतो. सरकारी कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी होतात. ते आयोगाच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. राजकीय पक्षांच्या आचार-विचारांवर नजर ठेवण्यासाठी निवडणूक आयोग निरीक्षकांची नेमणूक करतो. जेव्हा आचारसंहिता लागू होते तेव्हा काय होऊ शकते आणि काय होऊ शकत नाही, याची ही परिपूर्ण माहिती येथे देत आहोत….

सामान्य नियम:

* कोणत्याही पक्षाने असे कार्य करू नये, ज्यामुळे जाती आणि धार्मिक किंवा भाषिक समुदायांमधील मतभेद किंवा द्वेष वाढेल.
राजकीय पक्षांवर टीका केवळ कार्यक्रम आणि धोरणांपुरती मर्यादित असावी, वैयक्तिकही असू नये.
* धार्मिक स्थळांना प्रचारासाठी व्यासपीठ म्हणून वापरू नये.
* मते मिळवण्यासाठी भ्रष्ट आचरणाचा वापर करू नये. उदा. लाच देणे, मतदारांना त्रास देणे इत्यादी.
* कोणाच्या परवानगीशिवाय त्याची भिंत, अंगण किंवा जमीन वापरू नये.
* कोणत्याही मेळाव्यात किंवा मिरवणुकीत व्यत्यय आणू नये.
* राजकीय पक्ष कुणाच्याही धार्मिक किंवा वांशिक भावना दुखावणारे कोणतेही अपील जारी करू शकत नाहीत.

राजकीय बैठकींशी संबंधित नियमः
* सभेची जागा आणि वेळ आधी पोलिस अधिकाऱ्यांना कळवणे आवश्यक आहे.
* पक्ष किंवा उमेदवारांनी हे आधीच सुनिश्चित केले पाहिजे की, त्यांनी निवडलेल्या जागेवर निषिद्ध आदेश लागू नाही.
* प्रथम कार्यक्रमस्थळी लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी मिळवावी.
* संमेलनाच्या आयोजकांनी व्यत्यय आणणाऱ्यांवर कारवाई करण्यात पोलिसांना मदत करावी.

मिरवणुकीचे नियमः
* मिरवणुकीचा वेळ, आरंभ करण्याचे ठिकाण, मार्ग आणि शेवटची वेळ निश्चित करून पोलिसांना आधी कळवावी.
* मिरवणूक अशी असावी की, जेणेकरून वाहतुकीवर परिणाम होणार नाही.
* जर राजकीय पक्षांनी एकाच दिवशी, एकाच मार्गाने मिरवणूक काढण्याचा प्रस्ताव ठेवला असेल तर प्रथम वेळेबद्दल बोलावे.
* रस्त्याच्या उजव्या बाजूला मिरवणूक काढली पाहिजे.
* मिरवणुकीत अशा गोष्टी टाळाव्यात, ज्यांचा गैरवापर होऊ शकतो.

मतदानाच्या दिवसाशी संबंधित नियमः
* अधिकृत कामगारांना बॅज किंवा ओळखपत्र द्या.
* मतदारांना देण्यात येणारी स्लीप साध्या कागदावर असावी आणि त्यावर चिन्ह, उमेदवार किंवा पक्षाचे नाव नसावे.
* मतदानाच्या दिवशी आणि त्यापूर्वी 24 तास कोणालाही मद्य वाटू नये.
* मतदान केंद्राजवळील शिबिरांना गर्दी करू नये. शिबिरे सुयोजित असावीत.
* मतदानाच्या दिवशी वाहन चालवण्यास परवानगी मिळवावी.

सत्ताधारी पक्षाचे नियमः
* सत्ताधारी पक्षाने आपल्या कार्य-कृतींमधून तक्रारींना वाव देऊ नये.
* मंत्र्यांनी सरकारी दौर्‍यादरम्यान प्रचाराची कामे करू नये.
* या कामात सरकारी यंत्रणा व कर्मचारी वापरू नये.
* सरकारी विमान आणि वाहने पक्षाच्या हितासाठी वापरू नयेत.
* हेलिपॅडवर एकाधिकार दाखवू नये.
* विश्रामगृहे, डाक-बंगले किंवा सरकारी निवासांवर एकाधिकार असू नये.
* या ठिकाणांचा उपयोग प्रचार कार्यालयासाठी केला जाऊ नाही.
* सरकारी पैसा खर्च करून जाहिरातींद्वारे आपले यश दाखवू नये.
* सर्किट हाऊसमध्ये राहिल्यासच मंत्र्यांच्या शासकीय भ्रमंतीवर गार्ड लावले जावेत.
* मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येऊ नये.
* बदली किंवा पदस्थापनेसाठी निवडणूक आयोगाची पूर्व मंजुरी गरजेची आहे.

मुख्यमंत्री हे कार्य करू शकत नाहीतः
* शासकीय दौरा (अपवाद सोडून).
* विवेकाधीन निधीतून अनुदान किंवा स्वीकृती.
* प्रकल्प किंवा योजनेची कोनशिला.
* रस्ते बांधकाम किंवा पिण्याच्या पाण्याची सुविधा देण्याचे आश्वासन.

निवडणूक अधिकारी/कर्मचाऱ्यांसाठी नियम:
* सरकारी कर्मचारी कोणत्याही उमेदवाराचे निवडणूक, मतदार किंवा मोजणी एजंट बनू शकत नाहीत.
* जर मंत्री दौऱ्याच्या वेळी खासगी निवासस्थानी थांबले असतील, तर त्यांनीही बोलावल्यावरही तिथे जाऊ नये.
* निवडणुकीच्या कामासाठी नेमलेल्यांना मंत्र्यांना सोबत घेता येणार नाही.
* ज्यांची ड्यूटी लागली आहे असे अधिकारी-कर्मचारी वगळून इतरांनी सभा किंवा अन्य राजकीय कार्यक्रमात भाग घेऊ नये.
* राजकीय पक्षांना सभेसाठी जागा देताना भेदभाव केला जाऊ नाही.

लाऊड स्पीकरच्या वापरावरील निर्बंध
निवडणुका जाहीर होण्याच्या वेळेपासूनच बैठकी आणि वाहनांमध्ये वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरच्या वापरासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. त्यानुसार ग्रामीण भागात सकाळी 6 ते रात्री 11 या वेळेत आणि शहरी भागात सकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत त्यांचा वापर करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.

उल्लंघन केल्यास आयोग काय करू शकतो?
> जर एखादा उमेदवार किंवा राजकीय पक्षाने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले तर निवडणूक आयोग नियमानुसार कारवाई करू शकतो.
> उमेदवारांना निवडणूक लढण्यापासून रोखता येऊ शकते. आवश्यक असल्यास फौजदारी गुन्हादेखील दाखल केला जाऊ शकतो.
> आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button