breaking-newsमुंबई

आठ महिन्यांच्या गर्भवती आमदार नमिता मुंदडा यांची विधिमंडळ अधिवेशनाला हजेरी, म्हणाल्या – गर्भधारणा हा आजार नाही

मुंबई | महाईन्यूज

बीडमधील भाजप आमदार नमिता मुंदडा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनल्या आहेत. नमिता 8 महिन्यांच्या गर्भवती असताना देखील त्या विधिमंडळाच्या अधिवेशनाला हजेरी लावत आहेत. त्यांना एक सशक्त महिला म्हणून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.नमिता मुंदडा यांनी सांगितले की, ‘शुक्रवारपासून विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. अशावेळी यात सहभाग घेणे माझे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. गर्भधारणा हा काही आजार नव्हे तर जीवनाचा एक भाग आहे.’ बीड जिल्ह्यातील स्त्री भ्रूणहत्या, ऊसतोड महिला कामगारांचं गर्भाशय काढणे, यासारखे अनेक मुद्दे गाजत आहेत.

नमिता यांनी सांगितले की, विधानसभा अधिवेशनात हजेरी लावणाऱ्या आपण पहिल्याच गर्भवती आमदार असल्याचं ऐकलं आहे. त्या म्हणाल्या की, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. माझ्या मतदारसंघात असे अनेक मुद्दे आहेत जे मी सभागृहात मांडले पाहिजेत.’ नमिता पुढे सांगतात की, ‘मला देखील इतर गर्भवती महिलांप्रमाणे समस्या आहेत, परंतु मी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करते आणि काम करतेवेळी स्वतःची काळजी घेते आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button