breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आंबोलीमध्ये गॅस टँकर आणि क्रेनमध्ये अपघात, मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 3 किमीपर्यंत वाहतूक कोंडी

पालघर | मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रोपोलीन गॅसचा टँकर आणि एका क्रेनमध्ये भीषण अपघात झाला आहे. रात्री 12 वाजेची दरम्यान महामार्गावरील आंबोली येथे हा अपघात झाला. यानंतर राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. अपघातामुळे गुजरातकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

या अपघातानंतर घटनास्थळावर वाहतूक पोलीस दाखल झाले आहेत. त्यांनी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. ठप्प झालेली वाहतूक महामार्गावरील सर्व्हिस रोडवरुन संथगतीने सुरु करण्यात आली आहे.

प्रोपोलिन गॅस टँकर क्र. जी. जे. 06 ए. झेड. 6989 गुजरातकडे जात असताना टँकरने आंबोली ब्रिजवर क्रेनला मागून जोरदार धडक दिली. यामुळे दोन्ही वाहनांचं प्रचंड नुकसान झालं. तसेच रस्ताही ब्लॉक झाला. अपघातामध्ये कोणताही जीवितहानी झालेली नाही. मात्र, गॅस टँकरचा अपघात झाल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वाहतूक पोलिसांकडून उपाय म्हणून वाहतूक वळवण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button