breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अश्विनी जोशी यांची तडकाफडकी बदली

महाईन्यूज | मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पालिका मुख्यालयाला भेट दिल्यानंतर अतिरिक्त महापालिका आयुक्त अश्विनी जोशी यांची शुक्रवारी तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे. सत्ताधारी शिवसेनेसह अन्य पक्षांचे नगरसेवक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची नाराजी आणि मनमानी कारभार अश्विनी जोशी यांना भोवल्याची चर्चा पालिकेत सुरू होती.काही महिन्यांपूर्वीच अश्विनी जोशी यांची मुंबई महापालिकेतील अतिरिक्त पालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली होती. यापूर्वी अतिरिक्त पालिका आयुक्तपदी असलेल्या आय. ए. कुंदन यांची बदली झाल्यानंतर भाजप सरकारने अश्विनी जोशी यांना पालिकेत पाठविण्यात आले होते.

पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात कुंदन यांनी घेतलेल्या निर्णयांमध्ये जोशी यांनी काही फेरबदल केले व हे फेरबदल वादग्रस्त ठरले होते. त्यानंतर आरोग्य, नगर अभियंता आणि अन्य विभागांमध्ये त्यांनी घेतलेले निर्णय, सुरू केलेले चौकशीचे सत्र आदी प्रकरणांमुळे त्यांच्यावर पालिका वर्तुळात प्रचंड नाराजीचा सूर उमटू लागलेला होता. नगरसेवकांच्या मागण्यांचाही विचार होत नसल्याची तक्रार स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी अनेकदा केली होती. इतकेच नव्हे तर अश्विनी जोशी यांच्याविरोधात पालिका सभागृहात अविश्वास ठराव मांडण्याच्या हालचाली सत्ताधारी शिवसेनेने सुरू केलेल्या होत्या. एका डॉक्टरच्या बढतीवरून आरोग्य समितीमध्ये मोठा वादही झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button