breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा सोमवारी शिवसेनेत होणार प्रवेश!

मुंबई – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सोमवारी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

शिवसेनेने राज्यपाल नियुक्त आमदारांसाठीच्या यादीत उर्मिला यांचं नाव राज्यपालांकडे दिलेलं आहे. त्यामुळे त्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. त्यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारत शिवसेनेची ऑफर स्विकारली होती. उर्मिल यांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. नंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांना फोन करून त्यांचं आमदारकीसाठी मन वळवलं होतं.

उर्मिला शिवसेनेत आल्या तर त्याचा फायदा होण्याची शक्यता असल्याने त्यांना पक्षात घेण्याचा विचार झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button