breaking-newsमुंबई

अंतिम वर्षांच्या परीक्षेसंदर्भात सुनावणी पुढच्या सोमवारपर्यंत स्थगित

मुंबई – अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यासंदर्भात यूसीजीने दिलेल्या नियमावलीविरोधात युवासेनेने याचिका दाखल केली होती. या याचिकेवरच्या सुनावणीला पुढच्या सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. यूजीसीला या संदर्भात उत्तर देण्यासाठी ३ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे ही सुनावणी पुढील सोमवारपर्यंत टळली आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. युवासेनेनेही या प्रकरणी याचिका दाखल केली होती.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील अंतिम वर्षांतील परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र परीक्षा रद्द करणं बेकायदा असल्याचं सांगत यूसीजीने परीक्षेसाठी मार्गदर्शक नियमावली प्रसिद्ध केली होती. या विरोधा युवासनेने हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात नेले आहे. तसंच, यूजीसीने दिलेल्या नव्या सूचना रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात एका केंद्र शासित प्रदेशासह १३ राज्यातील विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी आज सुनावणी होणार होती. मात्र ती आता पुढील सोमवारपर्यंत टळली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button