breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबई

पहिल्याच पावसात मुंबई तुंबली! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले..

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, पुण्यात शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. तर दुपारनंतर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. दोन ते तीन तास सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या काही भागांत पाणी साचलं.

पत्रकारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पहिल्याच पावसाच मुंबई तुंबून सर्वत्र पाणी साचलं आहे असा प्रश्न विचारला. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, अरे बाबा, पाऊस झालं त्याचं स्वागत करा. पाणी साचलं हे काय. पाऊस झाला त्यावर बोलत नाहीत. बळीराजा आणि आपण सगळे त्यांचं आनंदाने स्वागत करूयात. गेले अनेक दिवस आपण त्याची वाट पाहत आहोत. अखेर आज पाऊस झाला आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

Image

हेही वाचा – आयुष्मान भारत योजना अन् महात्मा फुले आरोग्य योजना यांचे एकत्रीकरण होणार!

https://twitter.com/Sarangsspeaks/status/1672822598118567936

दरम्यान, मुंबईतील सायन सर्कल, अंधेरी सबवे आणि दहिसर वेस्टन एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी तुंबल्याचं पाहायला मिळत आहे. या शिवाय दहिसर वेस्टन एक्सप्रेस हायवेवर सुद्धा पाणी साचलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button