breaking-newsTOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रमुंबई

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मुकेश अंबानींची मोठी घोषणा

देशभरातील प्रत्येक गावात JIO 5G सुविधा उपलब्ध करणार

मुंबई : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर मोबाईल युजर्ससाठी आनंदाची बातमी आली आहे. रिलायन्स उद्योग समूहाचा कारभार हाती घेऊन कंपनीचे अध्यक्ष, मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांना 20 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त अंबानी यांनी JIO 5G नेटवर्कबाबत मोठी घोषणा केली आहे.

रिलायन्स टेलिकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली 2023 मध्ये देशभरातील प्रत्येक शहरात, गावात JIO 5G सुविधा उपलब्ध होईल. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत युनिक डिजिटल सोल्यूशन प्रदान करण्याची ही संधी आहे, असं मुकेश अंबानी म्हणाले.

टेलिकॉम क्षेत्रात आपलं पहिल्या क्रमांकाचं स्थान आणखी मजबूत केल्याबद्दल मी जिओ टीमचं अभिनंदन करतो. जिओ प्लॅटफॉर्म्सनं आता भारतातील पुढील मोठ्या संधीसाठी सज्ज झालं पाहिजे, असे आवाहन मुकेश अंबानी यांनी केलं.

JIO 5G नेटवर्क कमालीचा स्पीड, लोअर लेटन्सी आणि डेटा नेटवर्कला अधिक सक्षम करील, असंही अंबानी म्हणाले. सोबतच मुलगी ईशाच्या नेतृत्वाखाली रिलायन्सचा रिटेल व्यवसाय झपाट्यानं वाढल्याचा दावाही मुकेश अंबानी यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button