breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्रराजकारण

‘आदिपुरूष चित्रपटावर बंदी आणा’; खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

पिंपरी : आदिपुरूष हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि चांगलाच वादात सापडला आहे. चित्रपटातील संवाद, व्हीएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान व क्रिती सेनॉन यांच्या अभिनयावर नेटकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. दरम्यान, या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे खासादर श्रीरंग बारणे यांनी केली आहे.

खासदार श्रीरंग बारणे यांनी आदिपुरष सिनेमावरून बंदी घालण्याची मागणी केली आहे. आदिपुरूषमुळे भारताची बदनामी होत आहे, असं श्रीरंग बारणे यांनी म्हटलं आहे. बारणे यांनी केंद्रीय माहिती मंत्री अनुराग ठाकूर आणि प्रसून जोशी यांना पत्र लिहून या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मात्र भाजप खासदार रवी किशन यांनी या सिनेमाचं चांगलच कौतुक केलं आहे.

हेही वाचा – राज्य सरकारचा वारकऱ्यांना दिलासा! वारकऱ्यांसाठी ‘विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना’ लागू

दरम्यान, नेपाळची राजधानी काठमांडूत या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच काठमांडूत आदिपुरूषसह सर्वच भारतीय सिनेमांवर बंदी घातली आहे. तसंच नेपाळचं प्रमुख पर्यटन केंद्र असलेल्या पोखरामध्येही आदिपुरूषवर बंदी घालण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button