क्रिडाताज्या घडामोडीराष्ट्रिय

क्रिकेट विश्वावर शोककळा, क्रिकेटपटू जोश बेकरने वयाच्या २० व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

जोश बेकरच्या निधनानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने शोक व्यक्त केला

लंडन ः इंग्लिश क्रिकेटपटू जोश बेकर याचे वयाच्या अवघ्या २० व्या जगाचा निरोप घेतला आहे. या खेळाडूने मृत्यूच्या एक दिवस आधी क्रिकेटच्या मैदानावर आपल्या शानदार गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या खेळाडूच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. या खेळाडूचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ज्यामध्ये या खेळाडूने मृत्यूच्या एक दिवस आधी काउंटी क्रिकेटमध्ये वूस्टरशायरकडून खेळताना ३ विकेट घेतल्या होत्या. त्याने एका डावात २० षटके टाकली होती. यादरम्यान ६६ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने थॉमसलाही ४७ धावांवर बाद केले होते. बेकरच्या मृत्यूबाबत सस्पेंस आहे. क्लबने त्याच्या मृत्यूची माहिती दिली आहे, परंतु बेकरचा मृत्यू कसा झाला हे उघड केले नाही. वोस्टरशायरचे मुख्य कार्यकारी ॲशले गिल्स यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. जोशच्या निधनाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसल्याचे ते म्हणाले.

वेल्स क्रिकेट बोर्डाने व्यक्त केला शोक –
जोश बेकरच्या निधनानंतर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने शोक व्यक्त केला आहे. मंडळाने सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला. कौंटी संघानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. वूस्टरशायरने एक्सवर लिहिले, “जोश बेकरचे वयाच्या २० व्या वर्षी निधन झाल्याचे सांगताना वूस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लबला अतिशय दुःख होत आहे. आम्ही सर्वजण जोशच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहोत.

जोश बेकरची कारकीर्द –
बेकरच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे, तर तो प्रभावी ठरला आहे. जोश बेकरने २०२१ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने यावर्षी लिस्ट ए मध्येही पदार्पण केले. त्याने २०२२ मध्ये कारकिर्दीतील पहिला टी-२० सामना खेळला होता.त्याने २२ प्रथम श्रेणी सामन्यात ४३ विकेट्स घेतल्या आहेत. बेकरची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे ५१ धावांत ४ विकेट्स घेणे आहे.

त्याने १७ लिस्ट ए सामन्यात २४ विकेट्स घेतल्या आहेत. यासोबतच टी-२० सामनेही खेळला आहे. त्याने ८ सामन्यात ३ विकेट्स घेतल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे बेकरने फलंदाजीसोबतच गोलंदाजीमध्येही शानदार कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ४११ धावा केल्या आहेत. या काळात त्याने २ अर्धशतके झळकावली आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button