Uncategorized

दहीहंडी उत्सवात शोककळा; दापोली तालुक्यात पाजपंढरी येथे गोविंदा नाचताना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्यानेमृत्यू

दापोली : कोकणात रत्नागिरी जिल्हयात दापोली तालुक्यात पाजपंढरी येथे गोविंदा नाचताना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने ५२ वर्षीय वसंत लाया चौगले या मच्छीमार व्यक्तीचे निधन झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ते गोविंदा खेळण्याचा आनंद घेत होते. त्यांनी दहीहंडी उत्सवात फेर धरून आनंदोस्तवही साजरा केला. पण याचवेळी त्यांना नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली. वसंत लाया चौगले असे मृत गोविंदांचे नाव आहे. ते पाजपांढरी गावचे रहिवासी होते. सध्या त्यांचे वास्तव्य हर्णै येथे होते.

हर्णै पाजपंढरी गावात कोळी समाज बांधवांतर्फे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पण या दुःखद घटनेमुळे गावातील गोविंदा सण कार्यक्रम रद्द करण्यात आले.

गावात सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला होता. यामध्ये वसंत चौगुले सहभागी झाले होते. पण नाचत असताना अचानक त्यांच्या छातीत कळ आल्याने ते जमिनीवर कोसळले. त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण त्याआधीच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने परिसरात पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button