Uncategorized

मोशीत साजरा झाला पिंपरी-चिंचवडमधील सर्वात मोठा हनुमान जन्मोत्सव

दक्षिणेश्वर हनुमान जन्मोत्सवासाठी भक्तांचा लोटला जनसागर, भव्य शोभा यात्रा मोठ्या उत्साहात, ग्रामस्थांचा पुढाकार

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथे दक्षिणेश्वर हनुमान जन्मोत्सव व भव्य शोभायात्रा उत्साहात संपन्न झाली. माजी नगरसेवक वसंत बोराटे आणि शिवसेना नेत्या रुपाली आल्हाट यांच्या अध्यक्षतेखाली या शोभा यात्रेला सुरुवात झाली.

शोभायात्रा मोशी येथील लक्ष्मी रस्ता येथून सुरुवात झाली. या शोभा यात्रेला स्थानिक नागरिक पाहण्यासाठी गर्दी करत होते. कारण, या शोभा यात्रेमध्ये मुख्य आकर्षण ‘‘बाहुबली हनुमान’’ व त्यांच्याबरोबर असलेली ‘‘वानर सेना’’ यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले गेले होते तसेच या यात्रेमध्ये विविध प्रकारचे वादक सहभागी झाले होते. त्यामुळे भक्तांमध्ये अत्यंत आनंदमय वातावरण निर्माण झाले होते. तसेच, या शोभायात्रेत हरिनामाच्या गजरात वारकरी संप्रदायातील वारकरी यात सहभागी झाले होते या शोभायात्रेत मर्दानी खेळ देखील घेण्यात आले. तसेच यात शोभायात्रेत हनुमानाचे मंदिर विद्युत रोषणाईने आकर्षक असेच सजवले गेले होते. त्यामुळे ही विद्युत रोषणाई केलेले मंदिर पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत होते

महाप्रसादाला भाविकांची गर्दी…
यात्रेत नागरिक व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते हा परिसर श्रीरामाच्या नावाने व हनुमानाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेलेला पाहायला मिळाला या परिसरात सगळे भगवे वातावरण झालेले पाहायला मिळत होते तसेच ही शोभायात्रा दक्षिणेश्वर हनुमान मंदिर परिसरात पोहोचल्यानंतर यावेळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या महाआरतीला भक्त तीस हजाराहून अधिक उपस्थित होते. या आरतीला ४० जोडप्यांना आरतीचा मान यावेळी मिळाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित गव्हाणे यांची उपस्थिती लाभली आरती पार पडल्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले होते या महाप्रसादात आंब्याचा रसाचा समावेश होता भाविक भक्तांना आंब्याच्या रसाची चव चाखता आली तसेच या महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button