breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रियव्यापार

गुजरातमध्ये मोदी, चोक्सी पेक्षा मोठ्या घोटाळ्याचा भांडाफोड; बँकांना तब्बल २२,८४२ कोटींचा चुना लावणाऱ्या एबीजी शिपयार्डविरोधात गुन्हा दाखल!

नवी दिल्ली |

विजय माल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी, पंजाब नॅशनल बँक घोटाळा अशी आत्तापर्यंत उघड झालेल्या मोठमोठ्या घोटाळ्यांची यादी नेहमीच बातम्यांमध्ये चर्चेत असते. या सर्व घोटाळ्यांनी ऐकणाऱ्या सगळ्यांचेच डोळे पांढरे केले होते. मात्र, आता याहून मोठ्या एका घोटाळ्याचा भांडाफोड गुजरातमध्ये झाला आहे. एकूण २८ बँकांना तब्बल २२,८४२ कोटींचा चुना लावणाऱ्या एबीजी शिपयार्ड या कंपनीविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी दिवसभर या कंपन्यांच्या कार्यालयांवर सीबीआयकडून छापेमारी सुरू होती! हा आत्तापर्यंत उघड झालेल्या सर्वात मोठ्या घोटाळ्यापैकी एक मानला जात आहे.

एएनआयनं दिलेल्या माहितीनुसा, सीबीआयनं एबीजी शिपयार्ड (ABG Shipyard) विरोधात आणि कंपनीच्या संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. एकूण २८ बँकांची तब्बल २२ हजार ८४१ कोटींना फसवणूक केल्याचा आरोप या कंपनीवर लावण्यात आला आहे. या प्रकरणात सीबीआयनं शनिवारी दिवसभर कंपनीच्या कार्यालयांवर धाडसत्र राबवलं. एबीजी शिपयार्ड कंपनीसोबतच कंपनीचे संचालक रिशी अग्रवाल, संथानम मुथुस्वामी आणि अश्विनी कुमार यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • काय आहे एबीजी शिपयार्ड?

एबीजी शिपयार्ड ही कंपनी मोठी जहाजं बनवणे आणि ती दुरुस्त करण्याच्या व्यवसायात आहे. या कंपनीचं मुख्यालय केंद्र गुजरातच्या दहेज आणि सुरतमध्ये असल्याची माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे. एबीजी शिपयार्ड लिमिटेड (ABGSL) या कंपनीचे मुख्य संचालक रिशी अग्रवाल आहेत. सुरतमधील कंपनीच्या शिपयार्डमध्ये तब्बल १८ हजार डेड वेट टनेज क्षमतेची जहाजं बांधण्याची क्षमता आहे. तर दुसरीकडे दहेजमधील शिपयार्डमध्ये १ लाख २० हजार डेड वेट टनेज (DWT) ची जहाजं बांधण्याची क्षमता आहे.

एबीजी शिपयार्डशी संबंधित मुंबईतील काही ठिकाणी देखील सीबीआयनं छापेमारी केल्याची माहिती एएनआयनं दिली आहे.

  • नेमका काय आणि कसा झाला घोटाळा?

यासंदर्भात सर्वात आधी स्टेट बँक ऑफ इंडियानं तक्रार दाखल केली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्टनुसार, एप्रिल २०१२ ते जुलै २०१७ या कालावधीमध्ये आरोपींनी एकमेकांशी संगनमत करून बेकायदेशीर कृत्य, निधी बँकेनं दिलेल्या कारणाव्यतिरिक्त दुसरीकडे वळवणे अशा गोष्टी केल्याचं समोर आलं आहे.

  • हजारो कोटींचं कर्ज…

एबीजी शिपयार्डवर सध्या एसबीआयचं २ हजार ९२५ कोटी, आयसीआयसीआय बँकेचं ७ हजार ०८९ कोटी, आयडीबीआयचं ३ हजार ६३४ कोटी, बँक ऑफ बडोदाचं १ हजार ६१४ कोटी, पीएनबीचं १ हजार २४४ कोटी आणि इंडियन ओव्हरसीज बँकेचं १ हजार २२८ कोटी रुपयांचं कर्ज आहे. गेल्या १६ वर्षात एबीजीएसएलनं एकूण १४६ जहाजं बांधली. यापैकी ४६ जहाजं निर्यात व्यवसायासाठी बांधण्यात आली आहेत. न्यूजप्रिंट कॅरिअर, सेल्फ डिसचार्जिंग अँड लोडिंग बल्क सिमेंट कॅरिअर, फ्लोटिंग क्रेन्स, इंटरसेप्टर बोट, डायनॅमिक पोजिशनिंग डायविंग सपोर्ट व्हेसल्स अशा अनेक प्रकारच्या जहाजांचा समावेश आहे. भारत आणि विदेशातीलही अनेक कंपन्यांना एबीजीनं जहाजं विकली आहे. २०११मध्ये एबीजीनं नौदलाकडून देखील जहाज बांधणीचं कंत्राट मिळवलं होतं. मात्र, कंपनीची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे तेव्हा हे कंत्राट रद्द झालं होतं.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button