ताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

मोदी सरकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय, जूनमध्ये खात्यात इतके पैसे जमा होणार

आनंदाची बातमीः पीएम-किसान योजनेचा १७ वा हप्ता जाहीर

नवी दिल्लीः केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पत्रकारांशी बोलताना कृषी क्षेत्राप्रती सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. चौहान म्हणाले, “पंतप्रधान मोदींचे गेल्या दोन कार्यकाळात शेतीला नेहमीच प्राधान्य राहिले आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदीजींनी सर्वप्रथम पीएम-किसान योजनेचा १७ वा हप्ता जाहीर केला आणि त्यांनी त्या संबंधित फाइलवर सही देखील केली.”

शेतकरी PM-KISAN योजनेच्या १७व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता लवकरच पीएम किसान सन्मान निधीचा १७वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीला जाणार आहेत. यादरम्यान, ते देशभरातील ९.२६ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या PM-KISAN योजनेचा हप्ता जारी करतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button