ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मोदी सरकार अपयशी ठरल्यास शेअर बाजारात घसरणीची चेतावणी

ब्रोकरेजला मोठी भीती

मुंबई : बहुचर्चित लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या शेवटच्या टप्प्यासाठी शनिवार, १ जून रोजी मतदान होत असून यानंतर पक्षांचे भवितव्य ४ जून रोजी उलगडणाऱ्या EVM मशीनमध्ये कैद होईल. त्यानंतर कोणाचे सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित होईल. अशा स्थितीत तज्ज्ञांनी निवडणूक निकालांबाबत आपले मत मांडले आणि सांगितले आहे की, एनडीए आघाडी सरकार स्थापन करू शकली नाही तर बाजारात काय होईल?

कोटक अल्टरनेट ॲसेट मॅनेजर्सचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार जितेंद्र गोहिल यांनी एनडीए आघाडी सरकार बनवण्यात अयशस्वी ठरली तर शेअर बाजारात २० टक्क्यांहून अधिक घसरणीची चेतावणी दिली आणि पूर्णपणे रिकव्हर होण्यास वेळ लागू शकतो असे म्हटले. गोहिल म्हणाले की अशा परिणामाची शक्यता कमी आहे, परंतु गुंतवणूकदारांनी पोर्टफोलिओमध्ये विविधता आणणे आणि निवडणुकीच्या निकालांपूर्वी जोखीम कमी करणे शहाणपणाचे ठरेल.

एक्झिट पोल ठरवेल बाजाराचा मूड
१ जून रोजी जारी एक्झिट पोलच्या आधी गोहिल म्हणाले की गुंतवणूक समितीने इक्विटींवर स्थिर भूमिका कायम ठेवली आहे. त्यांनी म्हटले की आमच्या मते एनडीए सरकार स्थापन करेल आणि भाजपला पूर्ण बहुमत मिळेल. १ जून रोजी निवडणुकीचा अंतिम टप्प्यात मतदान होईल तर ३ जून रोजी एक्झिट पोलनुसार बाजाराची दिशा ठरेल.

गोहिल पुढे म्हणाले की, मागील ३०३ जागांच्या तुलनेत भाजपच्या १०-२० जागांच्या विजयामुळे बाजाराच्या हालचालींवर फारसा फरक पडणार नाही कारण गुंतवणूकदार धोरणे चालू ठेवणारे स्थिर सरकार शोधत आहेत. या कारणास्तव, भाजपला पूर्ण बहुमत मिळाले तर बाजारासाठी चांगले असे आमचे मत आहे.

भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर…
याउलट भाजपने पूर्ण बहुमतापेक्षा कमी जागा जिंकल्या आणि एनडीएच्या मित्रपक्षांसोबत युतीचे सरकार स्थापन केले तर? या स्थितीत बाजार ५ ते १०% घसरण्याची शक्यता आहे मात्र, मध्यम मुदतीत यामुळे फारसा फरक पडणार नाही आणि बाजारात रिकव्हरी दिसून येईल. त्याचवेळी, एनडीए सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरल्यास बाजार २०% हून अधिक घसरण्याची शक्यता आहे आणि पूर्णपणे सिकव्हर होण्यासाठी वेळ लागेल.

कोणत्या क्षेत्रात होईल मोठी घसरण
गोहिल म्हणाले की, एनडीए सत्तेत न आल्यास PSU, कॅपिटल गुड्स, इन्फ्रा, डिफेन्सशी संबंधित शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा लागू शकतो, परंतु IT आणि एफएमसीजी क्षेत्रांमध्ये खरेदीचा जोर दिसून येईल. त्यांनी म्हटले की धोरणात्मक बदलांचा अंदाज लावणे कठीण आहे, कोटक यांना वाटते की गेल्या दहा वर्षांतील सुधारणा उलट करणे कठीण होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button