मराठवाडा

धाराशिव शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची ‘‘पायाभरणी’’

भाजपाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

धाराशिव  : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारकाचा सुमारे ३० वर्षांपासून हा विषय प्रलंबित होता. या स्मारकासाठी जागा मिळावी म्हणून आपण सातत्याने प्रयत्न आणि पाठपुरावा केला. कायद्याच्या काही बाबी आणि गुंतागुंती मुळे हा प्रश्न लवकर मार्गी लागू शकला नाही, अशा भावना आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक धाराशिव शहरात उभारण्यासाठी शासकीय दूधडेअरी येथील १ एकर जागा मंजूर झाली आहे. या जागेत स्मारकाचे भूमीपूजन नुकतेच करण्यात आले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व मातंग समाजातील सर्व मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा –  आरक्षणावरुन बांग्लादेशमध्ये महाविस्फोट, एकाच दिवशी 100 ठार, पोलीस स्टेशनमध्ये 13 पोलिसांची हत्या

आमदार पाटील म्हणाले की, आपले सरकार आल्यावर आता कोणत्याही परिस्थितीत मार्गी लावायचाच हे आपण ठरवले होते. या मंजुरीच्या प्रक्रियेसाठी आपल्याला सहाय्य करणारे सर्व अधिकारी, पदाधिकारी यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो.
हा प्रश्न मार्गी लावणे सोपे नव्हते मात्र अखेर आपल्या प्रयत्नांना यश आलेच. कोणत्याही परिस्थितीत जिद्द न सोडता प्रयत्नशील राहून कार्य केल्यास, यश मिळते हेच यातून आपल्या सर्वांना शिकता आले.

उजनीचे पाणी आणू शकलो : आमदार पाटील

उजनीचे पाणी आपण ऐन दुष्काळात आणू शकलो हे अशाच पद्धतीने अखंड जिद्दीने आपण कार्य केले त्यामुळेच शक्य होऊ शकले. तब्बल १२० किलोमीटर वरून अनेक तांत्रिक अडचणी दूर करत आपण हे कार्य देखील पूर्णत्वास नेले. धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटिबद्ध असून या ठिकाणी आता लवकरच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळा उभा राहील याचे समाधान वाटते, असेही आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button