breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘छगन भुजबळांना मराठ्यांसोबत दंगल घडवून आणायची आहे’; मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil | मराठा समाजासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे हे गेल्या काही दिवसांपासून पुन्हा चर्चेत आले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी एक गंभीर आरोप केला आहे. आमच्या आंदोलनासमोर ओबीसी आंदोलन उभे करून काहींचा दंगल घडवण्याचा डाव आहे. त्यासाठी लोक अंगावर घातली जात आहेत. छगन भुजबळ वारंवार चिथावणी देत त्यांना दंगल घडवून आणायची आहे. भुजबळ तलवार काढण्याची धमकी देत असेल, तर जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांनी तयार राहावे, यांनी दंगल घडवली तर माझा एकही माणूस मरता कामा नये. मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मी नेमकं महत्वाच्या विषयावर बोट ठेवल्याने सगळ्यांना पोटदुखी होऊ लागले. आम्ही केलेली मागणी सत्य असून ती अनेकांना रूचलेली दिसत नाहीये. मी आता एकटा पडलोय.

हेही वाचा     –      ‘शिक्षण ही काळाची गरज असून, विद्यार्थ्यांनी भविष्यातल्या संधी लक्षात घेऊन त्याप्रमाणे शैक्षणिक वाटचाल केली पाहिजे’; चंद्रकांत पाटील 

मराठ्यांचे नेते मतांचा विचार करतात आरक्षणाचा नाहीत. पण भाजपामधील सर्व ओबीसी नेते तसेच आमदार एकत्र झाले आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यायचे नाही हे त्यांनी ठरवलं आहे. हे मराठ्यांच्या नेत्यांना समजत नाही का? ओबीसी नेते पदाला आणि मताला किंमत द्यायला तयार नाहीत. याचा अर्थ तुम्हाला कळतंय का आरक्षण किती महत्वाचं आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडला आहेत. सर्व नोंदी सरकारी असून त्यात मराठा हा कुणबी असल्याचा उल्लेख आहे. मी नेमकं महत्वाच्या विषयावर बोट ठेवल्याने सगळ्यांना पोटदुखी होऊ लागली आहे. पण हा मुलगा जो पर्यंत या लढ्यात आहे तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळून देणार आहे. मराठ्यांच्या जीवावर निवडून येणारे ओबीसी नेते आता मराठा समाजासमोर उघडे पडले आहेत, असं जरांगे पाटील म्हणाले.

मराठा समाजातील बांधवांनी ६ जुलैपर्यंत आपली शेतीतील सर्व कामे आटोपून घ्यावीत. आपल्याला शांततेत रॅली काढायची आहे. ६ जुलै ते १३ जुलैपर्यंत जे मराठा आरक्षण रॅली ठेवली आहे. सगळ्यांनी ताकदीने लढायचं आहे. मी एकटा पडलो असलो, तर मागे हटणार नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button