पिंपरी / चिंचवड

अल्पवयीन मुलींसोबत अश्‍लील चाळे करणाऱ्यास अटक

पिंपरी l प्रतिनिधी

पाच आणि सहा वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींसोबत एका व्यक्तीने अश्‍लील चाळे केले. याप्रकरणी त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 4) आणि आठ दिवसांपूर्वी ओटास्कीम, निगडी येथे घडली.

जिसान अब्रार कुरेशी (वय 40, रा. अरिफचे भंगाराचे दुकान, अंकुश चौक, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका महिलेने रविवारी (दि. 6) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास फिर्यादी यांची पाच वर्षीय मुलगी आणि तिचा सात वर्षीय मावस भाऊ खेळत होते. त्यावेळी आरोपी कुरेशी यांनी तिचा विनयभंग केला. तसेच ‘कोणाला सांगितल्यास मी तुम्हाला सोडणार नाही’ अशी धमकी दिली. आरोपी कुरेशी याने आठ दिवसांपूर्वी ही अन्य एका सहा वर्षीय मुलीसोबत अशाच प्रकारचे अश्‍लिल चाळे केले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button