breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘महाविकास आघाडी म्हणाजे वज्रमूत अन् शरद पवार म्हणजे..’; शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे. महाविकास आघाडी म्हणजे वज्रमुठ नव्हे तर वज्रमूत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे हाताचा अंगटा आहेत, असं महेश शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेमुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे.

महेश शिंदे म्हणाले की, महाविकास आघाडीची वज्रमुठ नाही तर वज्रमूत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे हाताचा अंगठा आहेत. करंगळी हे बोट कशासाठी वापरतात हे सर्वांना ठाऊक आहे. ती करंगळी म्हणजे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आहेत. शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे म्हणजे हाताचे मधले बोट आहे. तिसरे बोट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार असून चौथे बोट हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. पवारांनी कोणाला कसा अंगठा दाखवला हे आजपर्यंत कोणाला कळाले नाही.

हेही वाचा – ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात

राऊतांची वक्तव्ये म्हणजे खंडीच्या वरणात लघुशंका केल्याचा प्रकार आहे. तिसऱ्या व चौथ्या बोटाने मधल्या बोटाला इतके चेपवले आहे की बोलायची सोय नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची वज्रमूठ नसून ती वज्रमूत आहे. जनता या महाविकास आघाडीला स्वीकारेल असे अजिबात वाटत नाही, असं महेश शिंदे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button