breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

महेश मांजरेकरांना कॅन्सरची लागण, नुकतीच झाली शस्त्रक्रिया

चित्रपट दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर  यांच्यावर मूत्राशयाच्या कर्करोगाची  शस्त्रक्रिया झाली. जवळपास दहा दिवसांपूर्वी मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली.   शस्त्रक्रियेनंतर महेश मांजरेकर हे घरी परतले असून त्यांची प्रकृती ठीक आहे.

गेल्या काही दिवसांपासून महेश मांजरेकर हे ‘मुळशी पॅटर्न’ या सुपरहिट मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकवर काम करत होते. ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ असं या चित्रपटाचं नाव आहे. ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात मांजरेकरांनी मद्यपीची भूमिका साकारली होती. आता ते हिंदी रिमेकचं दिग्दर्शन करत असून त्यात सलमान खान आणि त्याचा मेहुणा आयुष शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याची वाट पाहत असल्याचं मांजरेकर यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

महेश मांजरेकर यांनी ‘वाँटेड’, ‘जिंदा’, ‘रन’, ‘ओएमजी: ओह माय गॉड’ यांसोबत इतरही काही हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ‘वास्तव’, ‘कुरुक्षेत्र’, ‘विरुद्ध’ या हिंदी आणि ‘नटसमाट’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘मी शिवाजी पार्क’ या मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी ‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोचंही सूत्रसंचालन केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button