“तरुणांनी महाराष्ट्राचा वारसा जगासमोर सादर करावा”; शंभूराज देसाई

कोयनानगर : “महाराष्ट्रात पर्यटनाच्या अपार संधी आहेत. स्थानिक तरुणांनी मार्गदर्शक होऊन महाराष्ट्राचा चेहरा व्हावे. ही केवळ नोकरी नसून, ही एक जबाबदारी आहे आपल्या भूमीची ओळख जगासमोर ठेवण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) राज्यात ‘रिसॉर्ट्स डेस्टिनेशन टुरिस्ट गाईड कार्यक्रम 2024-25’ सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश राज्यातील पर्यटनस्थळांवर येणाऱ्या पर्यटकांना अधिक माहितीपूर्ण व समृद्ध अनुभव देणे आणि स्थानिक तरुणांना कौशल्यविकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
या कार्यक्रमात निवडलेल्या स्थानिक तरुणांना ऐतिहासिक, सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा समजावून सांगण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यात व्यावसायिकता, संवाद कौशल्ये, आणि ग्राहकसेवा या बाबींचाही समावेश असेल.
पर्यटनमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “हा उपक्रम फक्त रोजगारनिर्मितीचा प्रयत्न नसून, स्थानिक तरुणांना महाराष्ट्राचे पर्यटनदूत बनवण्याचा उद्देश आहे. त्यांच्याकडे असलेले स्थानिक ज्ञान, बोलीभाषा, आणि समज हे पर्यटकांसाठी मौल्यवान ठरेल.”
“मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रादेशिक कार्यालयाकडून माहिती दिली जाईल. तरुणांनी प्रोत्साहित होऊन या संधीचा लाभ घ्यावा.” देसाई यांनी स्पष्ट केले की, “महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मार्गदर्शक कार्यक्रमातून तरुणांना पर्यटन व्यवसायात उभे राहण्याची संधी मिळेल आणि पर्यटकांनाही स्थानिक संस्कृतीचा खरी अनुभूती मिळेल.”
हेही वाचा – “मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे ‘महाशक्ती’ तर नाही ना?”, रोहिणी खडसेंनी व्यक्त केली शंका
पात्रता व प्रशिक्षणाचे वैशिष्ट्य :-
पात्रता निकष:
वय: 21 ते 35 वर्षे
किमान शिक्षण: 8वी / एसएससी / एचएससी
इंग्रजी, मराठी, हिंदी किंवा परदेशी भाषा येणे आवश्यक
स्थानिक रहिवासी असणे आवश्यक
वैद्यकीय फिटनेस व पोलीस पडताळणी अनिवार्य
प्रशिक्षणाकरिता मानधन दिले जाणार नाही
नोकरीची हमी नाही
प्रशिक्षणामध्ये समावेश असलेले विषय:
अतिथी सत्काराचे शिष्टाचार
महाराष्ट्र व भारतातील पर्यटन संसाधने
स्थानिक वारसा व सांस्कृतिक विविधता
पर्यटक संवाद कौशल्ये व बहुभाषिक प्रावीण्य
प्रतीकशास्त्र, इतिहास, पर्यटन भूगोल
आपत्कालीन परिस्थिती हाताळणे, शाश्वत पर्यटन