राज्यातील १४ जिल्ह्यांना आज पावसाचा ‘यलो अलर्ट’
Maharashtra Weather | सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. काही भागात मुसळधार तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं देखील पाहायला मिळालं होतं. आजही राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आज राज्याच्या विविध भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन दिवसांत भारताच्या ईशान्य भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर १२ ते १५ तारखेदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटक किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता आहे. ११ ते १३ तारखेदरम्यान पश्चिम हिमालयी प्रदेशात आणि पुढील ५ दिवसांत पूर्व उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्रात आज आणि पुढचे काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा – भाजपची पुण्यातील चिंतन बैठक लांबणीवर, आता २१ जुलै रोजी नियोजन
मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुणे, सातारा, नाशिक, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यानुसार, या भागात १२ ते १४ जुलै दरम्यान पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.