breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला अटक

मुंबई | उरण येथे यशश्री शिंदे नावाच्या २२ वर्षीय मुलीची हत्या झाली होती. याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी दाऊद शेखला अटक करण्यात आली आहे. दाऊद शेखला कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यातून नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

२५ जुलैला ही तरुणी घरातून निघाली ती अखेरची, त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांनी दाऊद शेखवर आरोप केले होते. तर तो या घटनेपासून फरार होता. तो कुठे आहे याचा काहीही पत्ता लागत नव्हता. पण, अखेर नवी मुंबई पोलिसांनी त्याला कर्नाटकातून ताब्यात घेतलं. कर्नाटकच्या गुलबर्गा येथील शहापूरमधून सकाळी सहा वाजता त्याला ताब्यात घेण्यात आलं.

हेही वाचा    –      ‘फडणीस १०० वर्षाचे तरी ताठ उभे, सरकार वय नसताही वाकलंय’; राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी 

या तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये दाऊद शेख हा पीडित तरुणीचा पाठलाह करत असल्याचं दिसून आलं. ही तरुणी दुपारी ज्या रस्त्यावरुन गेली तिथूनच काही वेळात दाऊद शेख गेल्याचं दिसून आलं. उरणच्या खाडीत या तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दाऊदचा शोध सुरु केला.

दाऊदचा शोध घेण्यासाठी नवी मुंबई पोलिसांची एकूण सहा पथकं तैनात करण्यात आली होती. संपूर्ण राज्यात त्याचा शोध घेतला जात होता. त्यानंतर दाऊदच्या संपर्कातील एका व्यक्तीने तो कर्नाटकात असल्याचं सांगितलं. कर्नाटकमधून तो केरळला जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांना त्याला त्याआधीच पकडायचे होते. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांचं पथक कर्नाटककडे रवाना झालं. त्यानंतर सकाळी सहा वाजता त्याला गुलबर्गा येथून अटक करण्यात आली. त्याला संध्याकळपर्यंत नवी मुंबईत आणलं जाईल. त्यानंतर त्याची चौकशी केली जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button