breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबई
Xiaomi इंडियाच्या प्रमुख मनू कुमार जैन यांचा राजीनामा
![Xiaomi India chief Manu Kumar Jain resigns](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Manu-Kumar-Jain-resigns-780x470.jpg)
मनु जैन गेल्या 9 वर्षांपासून कंपनीशी निगडित होते
मुंबई : जगभरातील आर्थिक संकटामुळे अनेक टेक कंपन्यांमध्ये नोकरकपात चालू आहे. एक एक वरिष्ठ अधिकारी कंपनी सोडत आहेत. आता भारतात शून्यातून करोडोंचा व्यवसाय उभारणाऱ्या स्मार्टफोन ब्रँड Xiaomi आणि तिच्या भारतीय शाखेचे माजी प्रमुख मनू कुमार जैन यांनी अचानक राजीनामा दिला आहे.
मनु जैन गेल्या 9 वर्षांपासून कंपनीशी निगडित होते. 2014 मध्ये भारतीय मोबाइल बाजारात Xiaomi लाँच करण्यात मनु जैन यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यापुर्वी ऑनलाईन शॉपिंग साईट Jabing चे सहसंस्थापकसुद्धा होते.
आपल्या राजीनाम्यावर मनु कुमार जैन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, जीवनात परिवर्तन हीच एक एकमात्र स्थिरता आहे! गेल्या 9 वर्षांमध्ये, मला खूप प्रेम मिळाले. त्यामुळे निरोप घेणे कठीण होत आहे. तुम्हा सर्वांचे आभार.