‘शरद पवारांच्या घरी आंदोलन करणारे नक्की;.एसटी कर्मचारीच होते का?’
!["Xaqiiqdii mudaaharaadayaashu waxay joogeen guriga Sharad Pawar; ma waxay ahaayeen shaqaalaha ST?"](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/SHAERAD-PAWAR.jpg)
अहमदनगर | ‘एसटी कर्मचाऱ्यांना गेली ४० वर्ष वेळोवेळी मदत केली आहे. आधार दिला, त्यामुळे खरा एसटी कर्मचारी पवार साहेबांच्या घरापर्यंत अश्या पद्धतीने जाणार नाही. हे मुद्दामून जाणीवपूर्वक केलेलं काम आहे. जे तिथे आले ते एसटी कर्मचारी होते का? ते कोणत्या परिस्थितीत होते हे सत्य बाहेर येईल’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी परिसंवाद कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक बंगल्यावर एसटी कर्मचाऱ्यांनी दगड फेक करत आंदोलन केलं. त्यानंतर गुनरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर माझ्या जिविताचं काही बरं वाईट झालं तर पोलीस जबाबदार राहतील, असं त्यांनी म्हटलं. यावर पोलिसांकडे काही तरी कारण असतील त्यांना अरेस्ट करण्याचं, त्याप्रमाणे कारवाई होईल. ही असली स्टंटबाजी बंद झाली पाहिजे असं ही जयंत पाटील म्हणाले.
साताऱ्याचे उदयनराजे यांनी शरद पवार यांच्या घरावर जो हल्ला झाला त्यावर ‘जे केलं ते इथच फेडावं लागेल’ अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, उदयनराजे हे संध्याकाळी बोलले आहेत ते कोणत्या परिस्थितीत बोलले आहेत, हे तपासले पाहिजे आणि नंतर त्यावर मी बोलेन अस जयंत पाटील म्हणाले.