Women’s IPL 2023 : महिला आयपीएलचे सामने मुंबईत होणार
![Women's IPL matches will be held in Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/Womens-IPL-780x470.jpg)
महिला प्रीमियर लीगला 4 मार्चपासून सुरूवात
मुंबई : महिला आयपीएल लिलावाबाबत आता महत्वाची माहिती समोर आली आहे. १३ फेब्रुवारीला हा लिलाव होणार आहे. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये होणार आहे. महिला आयपीएलचे सामने मुंबईत होणार असल्याची माहिती मिळत आहे.
महिला प्रीमियर लीगला 4 मार्चपासून सुरूवात होत आहे. ही IPL स्पर्धा फक्त मुंबईत म्हणजेच ब्रेबॉर्न आणि डी.वाय. पाटील स्टेडियमवर पार पडणार आहेत. अशी माहिती इंडियन प्रीमियर लीगचे कार्याध्यक्ष अरुण धुमल यांनी दिली.
महिला आयपीएलमध्ये ३२ सामने खेळले जाणार आहेत. ४ मार्चला पहिला सामना होणार आहे. तर २६ मार्चला आयपीएलचा अंतिम सामना खेळला जाणार आहे.
या लीगच्या पाच संघांच्या लिलावातून बीसीसीआयला ४६९.९९ कोटी रूपये, तर प्रसारण हक्कातून ९५१ कोटी रूपये मिळाले आहेत. आयपीएलमधील मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू, दिल्ली कॅपिटल्स या संघांसह कॅप्री ग्लोबल होलडिंग्ज आणि अदानी स्पोर्ट्सलाइन यांनी संघ खरेदी केले आहेत.