राज्यात लॉकडाऊन लागणार का? राजेश टोपेंनी दिलं स्पष्टीकरण
![Corona's third wave caught, no worries - Rajesh Tope](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/Rajesh-Tope.jpg)
जालना | टीम ऑनलाइन
कोरोनाचा संसर्ग आणखी वाढू नये याकरता गर्दीवर नियंत्रण लावणं गरजेचं आहे. त्यासाठी लॉकडाऊन लावला जातो. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत राज्यातही कडक लॉकडाऊन पुकारण्यात आला होता. आता ओमायक्रोनच्या संख्येत वाढ होत असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
ओमायक्रॉनचा प्रसार अशाच वाढत राहिला तर दरदिवशी ५०० मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल, अशी परिस्थइती उद्वभवली तर लॉकडाऊन लावावा लागेल असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
नागरिकांनी निर्बंधाचे पालन करून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. दरम्यान यापूर्वी 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागला तर लॉकडाऊन आम्ही ठरवलं होतं. पण राज्यातील ओमायक्रॉनची स्थिती पाहता ही मर्यादा 500 टनावर आणावी लागेल. दरम्यान सध्या निर्बंध लावण्याचा आमचा हेतू नाही मात्र काळजीपोटी हे प्रतिबंधात्मक उपाय करावे लागतील असेही टोपे म्हणाले.